
.
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर
राज्य शासनाने सामान्य ची दिवाळी गोड करण्याकरिता शंभर रुपयात आनंदाचा शिधा किट रेशन कार्ड धारकांना देण्याचे आदेश दिले होते परंतु राळेगाव तालुक्यातील अनेक गावात दिवाळी शिधा किटचा पुरवठा न झाल्याने लाभार्थी या किटच्या प्रतीक्षेत आहे. दिवाळी होऊन ही दिवाळी शिधा किट न मिळाल्याने शिधा किट मिळणार की नाही अशी चर्चा राळेगाव परिसरातील शिधापत्रिकाधारकात चर्चिल्या जात आहे.
सामान्य नागरिकांची दिवाळी गोड व्हावी याकरिता शासनाने आनंदाच्या शिधा किट वाटप करण्याचे आदेश दिले. एक किटमध्ये एक किलो साखर एक किलो चणाडाळ एक किलो रवा व एक लिटर पामतेल अवघ्या शंभर रुपयात देऊ केले. तातडीने त्याची अंमलबजावणी करण्याची उपाययोजना करण्यात आली परंतु राळेगाव तालुक्यातील अनेक गावात शिधापत्रिकाधारकांना दिनांक 26 ऑक्टोबर बुधवार पर्यंत शिधा किटचे वाटप करण्यात आले नव्हते. रेशन वाटप दुकानदारास अजून पर्यंत शिधा किट मिळाल्या नसल्याने शिधा किटचे वाटप आज पावतो होऊ शकले नाही. त्यामुळे आनंदाची दिवाळी गरीब सर्वसामान्य शिधापत्रिका धारकाची दिवाळी गोड करण्याची आश्वासन फोल ठरते की काय असे सर्वसामान्य शिधापत्रिकाधारकांना वाटत आहे.
राळेगाव तालुक्यातील अनेक गावात रेशन दुकानाचे अंतर्गत येणारे लाभार्थी आनंदाच्या शिदाकटच्या प्रतीक्षेतच असल्याने सामान्य नागरिकाच्या दिवाळीतील आनंदाचा गोडवा अधांतरीच राहिला आहे. शासनाने घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरावरील नागरिकाकडून स्वागत होत आहे.
