राळेगाव येथील पेट्रोल पंपावर अज्ञात चोरट्याने मारला एक लाखाचा डल्ला

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर

आज दिनांक 29 /09/ 2022 रोजी स्वंगी येथील गोविंद हिरामण ढुमणे राहणार सावंगी पेरका तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ व त्यांचा मुलगा अक्षय असे मोटर सायकलने राळेगाव येथे आले होते व त्यांनी भारतीय स्टेट बँक शाखा राळेगाव येथील बँक मधून नगदी एक लाख रुपये काढले व पैसे लाल रंगाचे नायलॉन थैलीमध्ये प्लास्टिक थैलीमध्ये नगदी एक लाख रुपये थैलीत टाकून मोटरसायकलचे मागे लटकवली व मोटरसायकल त्यांचा मुलगा अक्षय चालवत होता व वडील मागे बसले होते,मोटरसायकल घेऊन स्टेट बँक मधून ते चौहाण पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकण्यास आले असता व मोटर सायकल मधे पेट्रोल घेतले तेव्हा फिर्यादी व त्यांचा मुलगा दोघेही पैसे देण्यात गेले तेव्हा गाडी जवळ कोणीही नव्हते ते परत आल्यावर गाडीवर लटकवलेल्या पैसे व कागदपत्राचा थैला त्यांना दिसला नाही त्यांनी शोध घेतला असता कुठेही मिळून आला नाही, तेव्हा त्यांचे मोटर सायकल वर नगदी एक लाख रुपये व कागदपत्रे असलेली पिशवी लटकून दिसला नसल्याने ठेवलेल्या पैशाचा थैला कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी राळेगाव पोलीस स्टेशन गाठले व अज्ञात चोरट्यांच्या विरोधात कार्यवाही करण्याकरिता पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली, त्यारून पोलीस स्टेशन राळेगाव यांनी अपराध क्रमांक 272 /2022 नुसार कलम 379 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास राळेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार चौबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोहन पाटील व जमादार गोपाल बास्टर, सुरज चीव्हणे, विशाल कोवे करीत आहे.