प्रा. वसंत पुरके यांना राळेगाव विधानसभेत धनगर समाजाचा जाहीर पाठींबा

राळेगाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा.वसंत पुरके यांना विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. मेंढपाळ धनगर व धनगर समाज संघटनांनी नुकताच काँग्रेसचे माजी शिक्षणमंत्री आणि महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. वसंत पुरके यांना पाठिंबा देऊन भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन शनिवारी १६ नोव्हेंबर २०२४ ला कळंब येथे झालेल्या बैठकीत केले आहे.
राळेगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार प्रा. वसंत पुरके यांना राळेगाव, कळंब, बाभूळगाव तालुक्यात विविध स्तरावरून वाढता पाठिंबा मिळत आहे. महाविकास आघाडीकडुन प्रा. वसंत पुरके यांचा गावागावात जाऊन, घरोघरी जाऊन प्रचार सुरू आहे. ‌मेंढपाळ धनगर व धनगर समाजाचे युवा नेते राहुल सोनाळे यांनी प्रा. वसंत पुरके यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले.‌
याप्रसंगी महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री वसंत पुरके, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रविणभाऊ देशमुख, धनगर समाजाचे राजेश गायनार, डॉ. रमेश महानूर, राजू पोटे, मोहन बनकर, महादेव काळे, बालू पाटील दरने, नत्थुजी सोनाळे, गोमा टेळे, शेखलाल सोनाळे, सखाराम कुलाल, सरपंच कृष्णाजी अहिरे, नारायण कारंडे, पांडुरंग महानूर, भाऊराव महानूर,भीमराव कारंडे, राजू सोन्नर, भाऊराव दगडे,अंबर गोरे,समाधान केंगार, चंदू गहुकर, हरिदास कचरे, लिंबा कुलाल,शिवा महानूर, संजय नारायण सोनाळे, संजय गोमाजी सोनाळे व कार्यक्रमाचे आयोजक राहुल सोनाळे यांनी मेंढपाळ धनगर व धनगर समाज संघटनेचा जाहीर पाठिंबा असल्याचे नुकताच कळंब येथे पार पडलेल्या कार्यक्रमात जाहीर केले