
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव येथील इंदिरा गांधी कला महाविद्यालयात रसायनशास्त्र विभाग, रासोयो विभाग व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने रिलायन्स फाऊंडेशन मार्फत दिल्या जाणार्या स्कॉलरशिप प्रोग्रामची जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन दि. 26/09/2025 रोजी केले होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. शेख , आयक्यूएसी समन्वयक डॉ. कपिल जगताप तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणुन रिलायन्सचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा. विलास मालाधरी साहेब व रासेयो चे कार्यक्रम अधिकारी डॉ. स्वप्निल गोरे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. सतीश जाधव यांनी केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन रसायनशास्त्र विषया चे प्रा. पवन जगनित व प्रा. योगेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवलेला होता.
