प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मनसेकडून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, (मनसेच्या वरूड(जहागीर)शाखेचा उपक्रम)

सहसंपादक : रामभाऊ भोयर

प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेतील चिमुकल्या विद्यार्थांना खाऊ व शैक्षणिक साहित्य वाटप करून मनसेच्या वतीने गणराज्य दिन साजरा करण्यात आला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा वरूड (जहागीर) च्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन जि. प.प्राथमिक मराठी शाळेतील १५०चिमुकल्या विद्यार्थांना खाऊ व शालेय साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी सरपंच,उपसरपंच,ग्रामसेवक,ग्राम पंचायत सदस्य,मुख्याध्यापक अशोक फुलझेले यांच्यासह शाळेतील शिक्षक,गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी स्वप्निल नेहारे, खुशाल राऊत, किरण कोल्हे, सचिन आत्राम, सुरज खैरी, भारत राऊत, जयसिंग पवार, सागर ठाकरे, हर्शल घोडाम, आकाश ठाकरे, गणेश कडू, ओम नेहारे, चंद्रकांत कोल्हे, रोशन आत्राम, रतन चव्हाण, उमेश सिडाम, अमोल गेडाम, प्रविन आडे यांच्यासह मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.