(प्रतिनिधी) शेख रमजान
बिटरगांव परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आणि पोलिसांना तातडीने घटनास्थळी पोहोचता यावे, या उद्देशाने बिटरगांव पोलीस स्टेशनला तीन नवीन वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या वाहनांचे लोकार्पण आमदार किसन वानखेडे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
पोलीस अधीक्षक कुमार चिन्ता यांच्या मार्गदर्शनाखाली ही वाहने मंजूर करण्यात आली असून, यासाठी आमदार किसन वानखेडे यांनी शासनाकडे विशेष पाठपुरावा केला होता. वाढते शहरीकरण आणि गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडे सुसज्ज वाहने असणे ही काळाची गरज होती, जी या निमित्ताने पूर्ण झाली आहे.
या कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेते तथा माजी सभापती बाळासाहेब चंद्रे पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये परिसरातील महत्त्वाच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधले. त्यांनी बिटरगांव पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी ‘पोलीस वसाहत’ निर्मितीची गरज व्यक्त केली. तसेच ढाणकी-खरूस रस्त्यावरील नवीन पुलासाठी शासनाकडे तातडीने पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावावा, अशी आग्रही मागणी आमदार वानखेडे यांच्याकडे केली.
या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बिटरगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार पांडुरंग शिंदे, भाजप जिल्हासमन्वयक नितीन भुतडा, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश चव्हाण, बाळू पा. चंद्रे, ढाणकी नगर उपाध्यक्ष दत्तदिगंबर वानखेडे, भाजयुमो जिल्हाअध्यक्ष रोहित वर्मा, शिवसेना शहर प्रमुख संजय सलेवाड , प्रकाश जयस्वाल, महेश पिंपरवार, नागेश रातोळे , दिपक चंद्रे,शंकर जाधव, महेश शहाणे,कांता वासमवार, उमेश योगेवार, जॉन्टी विणकरे,रमेश गायकवाड, रमन रावते,शे. अहेमद , मल्हार चंद्रे, विजय जयस्वाल, शेख जब्बार, शेख एजाज, विनोद कांबळे यांसह स्थानिक लोकप्रतिनिधी, पोलीस अधिकारी आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.