
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील श्री लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात मागील एकोनविस महिन्यांपूर्वी दिनांक 9/9/2024 रोजी पोर्टल द्वारा झालेल्या माध्यमिक शिक्षक भरतीत नांदेड येथील अंकित कंधारकर हे हायस्कूल शिक्षक म्हणून रुजू झाले होते.त्यांची शिकविण्याची पद्धत, विद्यार्थ्यांशी प्रेमाने वागवणे, विद्यार्थ्यांना खेळी मेळीच्या वातावरणात शिकविणे अशा अनेक नवनवीन प्रयोगाने ते मोठ्या प्रमाणात विद्यार्थी प्रेमी झाले होते.अशाप्रकारे दैनंदिन जीवनात शाळेत अंकित कंधारकर सर रूजले असतांनाच त्यांनी शासकीय नोकरीसाठी दिलेल्या परीक्षेत ते पात्र ठरल्याने आणि शासकीय नोकरी ही त्यांच्या मुळ जिल्ह्यात म्हणजे नांदेड येथे असल्याने त्यांनी ही नोकरी सोडून नविन नोकरीत रुजू व्हायचे ठरविल्याने त्यांना विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी आणि शिक्षक शिक्षिका यांच्या वतीने आज दिनांक 11/4/2026 रोजी निरोप देण्यात आला त्यावेळी त्यांच्यातील सुप्त गुण, मैत्रीपूर्ण वागणूक, सदैव हसतमुख अशा वेगवेगळ्या गुणांमुळे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी यांना त्यांनी आपलेसे केले होते त्यामुळे अतिशय दुःखद वातावरणात हा सोहळा पार पडला.त्यावेळी अंकित सरांना कपडे, शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनी बंधू भगिनींनी आपल्या खाऊच्या गोळा केलेल्या पैशातून निधी एकत्र करून आपल्या लाडक्या शिक्षकांना भेटवस्तू देऊन सन्मानित केले.या कार्यक्रमाला मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी यांनी अंकित कंधारकर सर यांच्या कार्यावर प्रकाश टाकला त्यांनी सत्काराला उत्तर देताना मी कुठेही नोकरीला जात असलो तरी येथील शाळा, मित्रमंडळी, विद्यार्थी विद्यार्थिनी यांना विसरणे कदापी शक्य नसल्याचे सांगितले.या कार्यक्रमाला झाडगाव केंद्राचे केंद्र प्रमुख धनालकोटवार सर, मुख्याध्यापक विलास निमरड, जेष्ठ शिक्षक रमेश टेंभेकर,रंजय चौधरी राजेश भोयर मोहन आत्राम मोहन बोरकर, विशाल मस्के सौ.कुंदा काळे सौ.वंदना वाढोणकर एन्नावार मॅडम, अश्विनी तिजारे मॅडम, राहुल तुळणकर तसेच शिक्षकेतर कर्मचारी वाल्मिक कोल्हे,पवन गिरी शुभम मेश्राम बाबुलाल येसंबरे विनोद शेलवटे यांच्या सह अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी बंधू भगिनीं उपस्थित होते. सरांना निरोप देताना सर्वानी भावुक होऊन डोळे भरल्या अश्रूंनी निरोप दिला त्यावेळी कंधाकरर सरांना आपले अश्रू आवरता आले नाही.असा हा निरोप मला सदैव आठवणीत राहतील अशी प्रतिक्रिया कंधारकर सरांनी दिली.
