
राळेगाव तालुक्यातील सावरखेड व परिससर हा जंगली भाग असून येथे परिसरात आदिवासी लोकांची संख्या जास्त आहे. या परिसरातील नागरिकांना शासनाच्या विविध योजना काय असतात कशा घेता येईल या विषयावर आज सावरखेड येथे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम घेण्यात आला. राळेगाव चे आमदार डॉ. अशोक उईके, तहसीलदार अमित भोईटे, गटविकास अधिकारी केशव पवार, वडकी ठाणेदार विजय महाले, वनविभागाचे आर एफ ओ हटकर बाल विकास योजनेचे सागर विठाळकर यांनी उपस्थित नागरिकांना शासनाच्या विविध प्रकारच्या योजनाची माहिती दिली. तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी विविध कागदपत्रे यांचे स्टाल सुद्धा लावण्यात आले होते. विशेष म्हणजे गरजू नागरिकासाठी विविध आजाराचे डॉक्टर बोलावून नागरिकांची तपासणी सुद्धा करन्यात आली. या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे मा. जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजन दादा कोल्हे, डॉ. कुणाल भोयर,विवेक दौलतकर, महसूल विभाग, पंचायत समिती क्रुषी विभाग बचत गट, आशा वर्कर तसेच परिसरातील पुरुष, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
