
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दिनांक 14/10/2024 रोज सोमवारला ठीक अकरा वाजून तीस मिनीटांनीधान्य खरेदी शुभारंभ करण्यात आला.त्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांकडून काटा पूजन करण्यात आले.त्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती कडून होणाऱ्या खरेदीचा हमीभाव चार हजार चारशे पंधरा रुपये जाहीर करण्यात आला.त्यावेळी चार पाच शेतकऱ्यांनी आपलं सोयाबीन विक्रीसाठी आणले होते.त्यात सर्वप्रथम येणारे शेतकरी म्हणून डॉ कोकरे या शेतकऱ्यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.त्यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राळेगाव तालुका अध्यक्ष राजेंद्र तेलंगे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अंकित भाऊ कटारिया, गोवर्धन भाऊ वाघमारे गोविंद चहांदकर, विनोद काकडे, गोवर्धन वाघमारे, अंकुश मुनेश्वर, सुधीर जवादे तसेच शेतकरी गजानन पाल तसेच इतरही शेतकरी व खरेदीदार व्यापारी उपस्थित होते.सोबतच यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सुजित चल्लावार, मनोहर आडे , विनोद झांबरे, साईनाथ ताठे,ब्रम्हा दुधे,प्रविण कुबडे , घनश्याम वैद्य यांच्या सह इतरही कर्मचारी उपस्थित होते.
