
२३ सप्टेंबरपासून आझाद मैदानावर हजारो अंगणवाडी कर्मचारी करणार बेमुदत उपोषण — कॉम्रेड दिलीप उटाणे
सहसंपादक : रामभाऊ भोयर
आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन यवतमाळ जिल्हा शाखा बैठक 21 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हा अध्यक्ष सविता कटयालमल यांच्या अध्यक्षतेखाली तर राज्य अध्यक्ष कॉम्रेड दिलीप उटाणे, जिल्हा कार्याध्यक्ष पल्लवी रामटेके, जिल्हा सचिव गया सावळकर उपाध्यक्ष ,विजया जाधव रमा गजभार, ज्ञानेश्वरी शहारे सुरेखा सरोदे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थानिक श्रमशक्ती भवन यवतमाळ येथे पार पडली
संघटनेचे राज्याध्यक्ष यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की मानधन वाढ, ग्रॅच्युइटी व मासिक पेन्शनचा शासकीय आदेश निर्गमित होईपर्यंत २३ सप्टेंबरपासून आझाद मैदानावर हजारो अंगणवाडी कर्मचारी बेमुदत उपोषण करणार व 25 सप्टेंबर रोजी लाखो अंगणवाडी कर्मचारी जेलभरो करणार आहेत अशी माहिती — कॉम्रेड दिलीप उटाणे यांनी दिली
शासनाने योग्य दखल घेतली घ्यावी व अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करून चर्चा करण्यात येईल. मानधन वाढ, ग्रॅच्युइटी व मासिक पेन्शन मंजूर करण्यात येईल असे आश्वासन गेल्या काही काळापासून हे शासन कृती समितीला देत आहे. अनेक वेळा बैठकीच्या तारखा घोषित करण्यात आल्या. अनेक वेळा त्यांच्या विनंतीला मान देऊन आंदोलन स्थगित करण्यात आले. स्वतः मुख्यमंत्री महोदयांशी एक वेळ धावती भेट झाली आणि दोन वेळा त्यांनी स्वतः वेळ ठरवून बैठक आयोजित करून देखील प्रत्यक्षात ना बैठक झाली आणि ना शासकीय आदेश निर्गमित करण्यात आला.
दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिवाचे रान केले. शासकीय मेळाव्यात लाभार्थ्यांना घेऊन मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या. परंतु तरी देखील शासन आपल्याबद्दल गांभीर्याने विचार करायला तयार नाही. आता आपल्या आणि राज्य सरकारच्या हातात मोजके दिवस शिल्लक राहिले आहेत. दोघांनाही वेळ दवडणे परवडणारे नाही. त्यामुळे आपण विविध जिल्ह्यांमध्ये जेल भरो आंदोलने सुरू केली आहेत. आता २३ सप्टेंबरपासून मानधन वाढ, ग्रॅच्युइटी व मासिक पेन्शनचा शासकीय आदेश निघेपर्यंत आझाद मैदानावर प्रमुख नेते व कार्यकर्त्यांचे बेमुदत उपोषण सुरू करण्याचा व २५ सप्टेंबर रोजी प्रचंड संख्येने जेल भरो आंदोलन करण्याचा निर्णय अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने घेतला आहे.
या आंदोलनात यवतमाळ जिल्ह्यातील पाचशे अंगणवाडी कर्मचारी सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीला प्रणिता राजूरकर कुमुदिनी नागपुरे वैशाली कवडकर विना गुल्हाने , सुजाता चिंतकुटलावार ममता राठोड सुशीला पवार लिला सोळंकी मीरा जिद्दडेवार अर्चना कुळमते प्रणाली राखडे शोभना राऊत अर्चना हुमणे नलिनी गायकवाड रेखा चव्हाण आशा काळे चित्रलेखा नागपुरे इत्यादी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती
