
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव :- भावगंध सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दिनांक 15 /2/ 2026 रोज रविवारला हनुमान मंदिर सभागृह गुजरी येथे सायंकाळी 7.00 वाजता डॉ रवींद्र हुलके यांच्या अध्यक्षतेखाली स्व भाऊरावजी गोंडे यांचा बारावा स्मृतिदिन संपन्न. प्रथम स्वर्गीय भाऊरावजी गोंडे व तुकडोजी महाराज यांचे प्रतिमेचे पूजन मालारपण व दीप प्रज्वलन मान्यवरांचे हस्ते.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ रवींद्र हुलके,आणि विशेष व्याख्यानकरते विनय मिरासे यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ माननीय मधुकरराव घोटेकार यांचे हस्ते प्रदान करून स्वागत करण्यात आले . नंतर माननीय विनय मिरासे (अशांत) यवतमाळ ज्येष्ठ व्याख्याते यांचे “श्रद्धा व अंधश्रद्धा” या विषयावर व्याख्यान संपन्न.याप्रसंगी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी गीत भजन तर श्री उमेशभाऊ भोयर ,श्री भगवानजी दांदडे यांनी भजन सादर केले. स्वर्गीय भाऊरावजी गोंडे यांचे 12 व्या स्मृतिदिनानिमित्त भावगंध सार्वजनिक वाचनालय गुजरी तर्फे सामान्य ज्ञान स्पर्धा तथा सुंदर हस्ताक्षर स्पर्धा शनिवारला घेण्यात आली होती.या प्रसंगी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि बक्षीस प्रदान करण्यात आले त्यामध्ये प्रथम पाचशे रुपये, द्वितीय तीनशे रुपये ,तृतीय 150 रुपये ,प्रमाणे दोन गटांमध्ये प्रथम गट 5 ते 7 तर दुसरा गट 8 ते 12 स्पर्धा घेण्यात आली होती.
ततप्रसंगी प्रथम गटात योगेश्री महेश शिरपूरकर प्रथम वर्ग 5 वा जि प शाळा गुजरी ,अश्वजीत रणजीत कांबळे द्वितीय वर्ग सहावा न्यू इंग्लिश हायस्कूल राळेगाव, पुनम संजय राऊत वर्ग पाचवा जि प शाळा गुजरी तृतीय, तसेच द्वितीय गटामध्ये पूर्वा प्रफुल घोटेकर वर्ग 9 वा प्रथम ,अक्षदा लक्ष्मण धांदे वर्ग आठवा द्वितीय, तर ऋतुजा गजानन भोयर वर्ग आठवा तृतीय, द्वितीय गटातील सर्वच विद्यार्थि न्यू इंग्लिश हायस्कूल राळेगाव चे होते हे विशेष. सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम आरुषी झाडे, द्वितीय कुणाल भोयर, तृतीय डिंपल शिरपूरकर तर उर्जित गोंडे प्रोत्साहनपर असे बक्षीस व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक गोंडे ,प्रास्ताविक योगेश गोंडे ,आभार प्रदर्शन सुनील गोंडे यांनी मांडले. या कार्यक्रमास गोंडे परिवार, विद्यार्थी तथा ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
