
राळेगाव महसूल विभाग अँक्शन मोडवर आल्याने अवैध रेती मुरुम वाहतूक करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे दररोज कुठे तरी कारवाई चालूच असते त्यामुळे रेती, मुरुम अवैध वाहतूक करणाऱ्याची चिंता वाढली आहे.तालुक्यातील मौजा वालधूर येथील तलाठी शिवाणी सातोरकर, उपविभागीय अधिकारी वाहन ,चालक सुरज पारदी, यांनी तहसीलदार राळेगाव यांच्या आदेशानुसार आज दिनांक 04/02/24 रोजी दुपारी ४ वाजता दरम्यान मौजा वालधूर येथे अवैध मुरूम वाहतुक करणारा एक ट्रॅक्टर जप्त केला सदर ट्रॅक्टरचा पंचनामा करून पुढील दंडात्मक कार्रवाई करीता तहसील कार्यालय राळेगाव येथे जमा करण्यात आला आहे
