
विनोद अक्कलवार हे सन १९९८ पासुन राळेगाव तालुक्यात तलाठी म्हणुन कार्यरत आहे. नुकतीच प्रशासनाने त्यांना मंडळ अधिकारी म्हणून बढती दिली आहे
मुळ गाव राळेगाव तालुक्यातील सांवगी पेरका हे असुन त्यांची तालुक्यात एक अलगच ओळख आहे. ती म्हणजे रक्त दान करणारा माणूस, प्रत्येक सामाजिक कार्यात सहभागी होणे. सर्व सामान्य शेतकऱ्यांना योग्य न्याय देणे. शासकीय कामात नियमितता शासकीय कामाची , योजनांची अंमलबजावणी योग्य पध्दतीने करणे सर्व योजनांची माहिती देणे , या सर्व कामांसाठी त्याची ओळख तर आहे
विनोद अक्कलवार यांनी गुजरी गावाचा प्रभार घेतला तेव्हा पासुन तलाठी यांनी अनेक लोक उपयुक्त असे कार्यक्रम आयोजित केले, जसे गावांमध्ये शेतकऱ्यांना एकत्र करत गावातील अडचणीच्या असलेल्या अनेक पांदन रस्ते लोक वर्गणी गोळा करून मोकळे केले, कोरोना काळात गावात योग्य पध्दतीने नियोजन करुन गावातील युवा टीम च्या साह्याने गावात कोरोना येण्यापासून रोखला , कोरोणा काळात राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता तेव्हा गुजरी सारख्या लहाणशा गावात रक्तदान शिबीर आयोजित केलं होतं.
