युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा हीच माझी तळमळ:- हर्षलता बेलखडे,युवकांना रोजगार मिळण्यासाठी राबविणार विविध भरती मेळावे

:-

कारंजा (घा):-सद्या चांगल्याच चर्चेत असणारे कारंजा येथील जयकुमार बेलखडे व हर्षलताताई बेलखडे यांनी समाजसेवेची कास धरून आर्वी विधानसभा क्षेत्रातील असंख्य गावात जाऊन धार्मिक व सामाजिक कार्यात मदतीचा हात देत आहे.तेथील स्थगित असलेली कामे व त्याची शहानिशा करून योग्यरीत्या मार्गी लावत आहे ज्याप्रमाणे वंदनीय राष्ट्रसंत श्री.तुकडोजी महाराज ग्रामगीतेच्या माध्यमातून सांगतात ,लाख बोलक्याहुनी थोर एकचि माझा कर्तबगार असे सामाजिक नेतृत्व सद्या बघायला मिळत आहे.शेतकरी समस्या असो ,युवकांना रोजगार असो , महिला सक्षमीकरण व प्रत्येक तरुनाणी उद्योग करावा असा वसा घेऊन गावागावात जात आहे व अनेक समस्या सुद्धा सोडवल्या आहे, तर काही ठिकाणी त्यांना राजकीय दृष्टीने सुद्धा बघत आहे व काही राजकीय नेते गालबोट सुद्धा लावत आहे व एक भीती राजकीय वर्तुळात सुद्धा निर्माण झाली आहे. सद्या सर्व आर्वी मतदार संघात युवकांच्या मनात आनंदाच वातावरण बघायला मिळत आहे. मला आधीपासूनच समाज सेवेची आवड आहे माझ्या वर संस्कार सुद्धा देशसेवा पासून ते जनसेवा पर्यंत झाले आहे मला धार्मिक कार्यात आधी पासून आवड आहे .अवघाची संसार व्हावा सुखी मंगलता निघो सर्वा मुखी खळ दुर्जनाची दृष्टी निकी व्हावी सर्वदा या म्हणी प्रमाणे मला संतांच्या विचारांचा प्रत्येक माणूस हवा आहे त्यातूनच एक तरुण देशाकरिता एक बलवान शिपाई तयार होईल प्रत्येकाला सामाजिक कार्यात मोठी चळवळ सुरू होईल जय जवान व जय किसान नारा हा नेहमीच प्रत्येकांनी लक्षात ठेवला पाहिजे जब कीसानोकि देखू भलाई मैने खुशीया ही खुशीया मनाई, सुंदर अस भजन तुकडोजी महाराज यांनी शेतकऱ्यासाठी लिहिले आहे तीच शेतीची व्यवस्था बळकट करायला पाहिजे शेतीला पूरक व्यवसाय जोड धंदा करून शेतकरी उन्नत झाला पाहिजे हीच मनात तळमळ आहे व हीच माझी चळवळ आहे.