
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
नागरिकांच्या संरक्षणासाठी दिवस-रात्र मेहनत घेणाऱ्या पोलिसांच्या घराची दुर्व्यवस्था झाल्यामुळे पोलिसांच्या निवासस्थानाला ताडपत्री लावण्याची वेळ आली आहे.
विशेष म्हणजे मुख्य असलेल्या ठाणेदारांच्या निवासासह इतरही निवासाची दुर व्यवस्था झाली असून पावसाळ्यात या निवासांना गळती लागत असून येथील कार्यरत असलेल्या महिला ठाणेदारानी मान्सूनपूर्वच निवासाच्या छतावरती ताडपत्री टाकून पावसाच्या गळती पासून व्यवस्था केली आहे.
राळेगाव शहरातील ३२ गावाची जबाबदारी पार पाडणाऱ्या पोलीस दादांच्या वसाहतींची झालेली दयनीय अवस्था पाहता त्यांच्या कुटुंबीयांवर टांगती तलवार आहे. घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत, दारे-खिडक्या मोडकळीस आल्या आहेत अनेक घरांचे प्लास्टर निखळले आहे तर टीनाला छिद्र पडली आहे. त्यामुळे निवासाला पावसाळ्यात गळती लागत आहे.त्यामुळे पोलीस वसाहतीतील अनेक निवासाला ताडपत्री चा आधार दिला जात आहे. येथील पोलीस निवास हे बऱ्याच वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले आहे त्यामुळे या घरांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे. दिवस-रात्र डोळ््यात तेल घालून नागरीसुरक्षेसाठी लढणाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न मात्र सुटता सुटत नसल्याने मोडकळीस आलेल्या घरात पोलीस दादांना व त्यांच्या कुटुंबीयांना नाइलाजस्त्व वास्तव करावे लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
अपुरी निवासस्थाने व जीर्ण
सध्या उपलब्ध असलेली पोलीस निवासस्थाने कर्मचारी संख्येच्या तुलनेत अपुरी आहेत परिणामी अनेक पोलीस कर्मचारी शहरातील विविध भागात किरायाने घर घेऊन राहतात
