
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगरपरिषद मुख्याधिकारी यांना वाशिम शहरातील होणाऱ्या दूषित पाण्याच्या बाटल्या सप्रेम भेट जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या नेतृत्वात देऊन निषेध नोंदविण्यात आला दिनांक ५,६,७,मार्च २३ रोजी पिण्याचे पाण्याचा पुरवठा झाला हे पिण्याचे पाणी जुन्या वाशिम शहराला पुरविण्यात आले अशुद्ध पाणी पुरवठा गत पाच-सात वर्षापासून असाच सुरू आहे याकरिता आंदोलने करण्यात आलीत जिल्हा प्रशासनापासून नगर प्रशासनाची झोप उडवण्याचा प्रयत्न करण्यात आला कुणालाही सामान्याची आरोग्याची काळजी नाही हे निश्चित झाले हा पाणीपुरवठा साधारणता आठ ते दहा दिवसातुन १ दिवस होते प्रशासनातील सर्वच आरोचे पाणी पिऊन मस्त आहेत त्यांना अशुद्ध पिण्याचे पाणी माहीतच नाही कृपया हे चक्र थांबवा नाहीतर जन आंदोलन करण्यात येईल भव्य मोर्चा काढण्यात येईल हा इशारा यानंतर पूर्वसूचना न देता आंदोलन होईल याची खात्री असू द्यावी असे सूचित करण्यात आले यावेळी महिला सेनेच्या जिल्हा सचिव स्मिता जोशी, वाशिम तालुका अध्यक्ष विठ्ठल राठोड, शहर उपाध्यक्ष प्रतिक कांबळे,गणेश इंगोले मालेगाव तालुका संघटक महेश देशपांडे, तालुकाध्यक्ष गजानन कुटे, तालुका उपाध्यक्ष विनोद वानखेडे, रामेश्वर वाघ, कोषाध्यक्ष प्रमोद राठोड, महिला सेनेच्या वनिता पांडे, प्रमिला इंगळे, बेबी कोरडे, विमल गोदमले, पुष्पा रौंदळे, कैलास रौंदळे,आरु आदी पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते यावेळी पोलिसांनी चौक बंदोबस्त लावला होता
