
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड
प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप सन २०२३- २४ पासून सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याअनुषंगाने शेतकरी हिस्स्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व शेतक-यांना केवळ १/- रुपया भरून स्वत: शेतकरी यांनी बँक, विमा कंपनी प्रतिनिधी व CSC यांचे मार्फत पीक विमा भरावा असे वारंवार शासनाकडून सांगण्यात येत आहे योजनेत सहभागाची नोंदणी करण्यासाठी (CSC) धारकाला विमा कंपनीमार्फत प्रति अर्ज रक्कम रु. ४०/- देण्यात येते. परंतु उमरखेड तालुक्यातील (CSC) धारक शेतक-यांकडून अतिरीक्त पैसे घेऊन शेतकऱ्याची पिळवणूक करीत आहेत. होणारी शेतकऱ्यांची लूट थांबणार का असा सवाल शेतकरी वर्ग करीत आहेत उमरखेड तालुक्यातील सर्रास csc केंद्र धारक शेतकरी वर्गाकडून 100 रुपये घेत आहेत तहसीलदार साहेब याकडे लक्ष देतील का असा सवाल जनता करीत आहे
