
सहसंपादक : रामभाऊ भोयर
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सावंगी पेरका येथे आज दिनांक 22ऑगस्ट 2024 रोजी शाळेतील शिक्षिका सोनल नासरे मॅडम यांनी आपल्या मुलाचा पहिला वाढदिवस आगळावेगळा साजरा करुन नव्या उपक्रमाचा पायंडा पाडला. सर्व विद्यार्थ्यांना इयत्तेनुसार अंकलिपी, मराठी शब्दकोश, इंग्रजी शब्दकोश देण्यात आले.तसेच शाळेतील सर्व शिक्षिकांना डायरी व पेन देण्यात आले. तसेच नाश्ताही देण्यात आला. ग्रामसेवक महादेव वडे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना दिलेल्या पुस्तकांचे महत्व सांगितले. अतिशय उपयुक्त अशा पुस्तकांच्या व ज्ञानाच्या गंगेत चिरंजीव शशांक महादेव वडे या चिमुकल्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी नवीन उपक्रमाचे कौतुक केले व वडे कुटुंबाचे आभार मानले. मंगला आगरकर, रेखा कोवे, अर्चना सुरजुसे, सोनल नासरे, रमेशराव नासरे मंदा तातेवार, शीतल भुसारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम अतिशय थाटात साजरा करण्यात आला.
