पंचायत समिती उमरखेड उमेद महिलांच्या वतीने रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा

महागाव प्रतिनिधी:- संजय जाधव

उमरखेड, २५ ऑगस्ट २०२४ पंचायत समिती उमरखेड येथे उमेद बचत गट महिलांच्या वतीने रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महिलांनी एकत्र येऊन आपल्या भावांना राखी बांधली व त्यांच्यासाठी दीर्घायुष्य व सुरक्षिततेच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व प्रेरणा गितने सुरुवात करण्यात आली. महिलांनी परंपरेनुसार ऊमरखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री प्रवीण वानखेडे सहाय्यक गट विकास अधिकारी श्री यस . आर . गुलजार ऊमरखेड तालुका व्यवस्थापन अधिकारी रामदास इटकरे व सर्व कर्मचारी यांना राखी बांधून त्यांच्या दीर्घायुष्याची कामना केली. या प्रसंगी पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व उमेद मधील शेख तसलीम निगनूर प्रभाग समन्वयक, संजय तरवरे दराटी प्रभाग समन्वयक धम्मपाल ईगोले .माधुरी दळवी मुळावा प्रभाग समन्वयक वाढवे सर मोरे सर वाहुळे सर
सर्व कर्मचाऱ्यांनी महिलांना रक्षाबंधन सणाच्या शुभेच्छा दिल्या व त्यांच्या योगदानाची प्रशंसा केली.

संपूर्ण वातावरण आनंदाने व भावनेने भारलेले होते. या सणाच्या निमित्ताने महिलांनी एकत्र येऊन परंपरेचा सन्मान राखला व एकतेचा संदेश दिला.या कार्यक्रमाला सर्व प्रभागांमधील महिला उपस्थित होत्या