
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील रामतीर्थ येथे महसूल विभागाने अवैध रेती वाहतुकीवर सक्त कारवाई करत पहाटे सुमारे 6.30 वाजता एक ट्रॅक्टर जप्त केला.
रमेश महादेव मडावी (रा. रामतीर्थ) यांच्या मालकीचा हा ट्रॅक्टर 1 ब्रास रेतीसह अवैधरीत्या वाहतूक करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर महसूल पथकाने तत्काळ कारवाई केली. जप्त केलेला ट्रॅक्टर पुढील दंडात्मक कारवाईसाठी तहसील कार्यालय, राळेगाव येथे जमा करण्यात आला आहे.
ही मोहीम सुधीर पाटील (उपविभागीय अधिकारी, राळेगाव) आणि मा. अमित भोईटे (तहसीलदार, राळेगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. सदर कारवाई गाईड चव्हाण (मंडळ अधिकारी, राळेगाव) आणि मंगेश नांदेकर (ग्राम महसूल अधिकारी, उंदरी) यांच्या पथकाद्वारे पार पडली.
महसूल प्रशासनाने अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरुद्ध सुरू केलेल्या मोहिमेमुळे परिसरात धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी या कारवाईचे स्वागत करत प्रशासनाने नियमित गस्त वाढवावी, अशी मागणी केली आहे.
