
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथे ६ एप्रिल रोजी श्री राम नवमी महोत्सवाच्या शुभपर्वावर डॉ रवींद्रकुमार कानडजे तहसीलदार,एन.डी.बेंडे नायब तहसीलदार राळेगाव यांच्या प्रमुख उपस्थितीत निराधार योजना शिबीर घेण्यात आले.सदर यात १५ ते २० लाभार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले देण्यात आले तर १५ ते २० लाभार्थ्यांच्या संजय गांधी निराधार योजना व अपंग लाभार्थी यांच्या निराधार योजनाच्या या शिबिरामध्ये फाईली घेण्यात आल्या सदर या शिबिरा प्रसंगी बोलतांना महसूल विभागाचे कोणतेही काम करायचे असेल तर दलाला मारफत न जाता आपण ज्या कामासाठी आलो आहोत त्या कामाच्या संबंधित अधिकाऱ्यां पर्यंत पोहोचले तर आपले काम लवकर होईल व आपला पैसाही कमी खर्च होईल असे मत डॉ रवींद्रकुमार कानडजे तहसीलदार राळेगाव यांनी व्यक्त केले या शिबिरा प्रसंगी सरपंच उमेश गौऊळकार, ह.भ.प.नामदेव वाढंई महाराज,पोलीस पाटील ढगेश्वर मांदाडे व महसूल विभागाचे अधिकारी( नायब) तहसीलदार एन.डी.बेंडे, मंडळ अधिकारी पोटे, तलाठी सारंग हमद,तलाठी वाढोणकर, पुरवठा विभाग अक्षय विरुळकर, शुभम वानखडे, सचिन त्रिपदवार,दिपक खीरडकर,सुधाकर कुटे व ग्रामपंचायत कर्मचारी राजु पंडीले,भास्कर तोडासे व गावातील गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते
