फुलसावंगीत चोरट्यांचा धुमाकूळ,एकाच रात्री तीन दुकाने फोडली ,घटना सिसीटिव्हीत कैद

7


येथील किनवट रोडवरील पुण्येश्वर टेकडी समोरील तीन दुकाने काल मध्यरात्री चोरट्याने फोडून किराणा समानासह हजारो रुपये उडविले.
रितेश भारती यांचे किराणा दुकानातून एक मोबाईल,साडेपाच हजार रुपये रोख तर काजू,बदाम सारखे सुका मेवा असा महागडा किराणा अंदाजे वीस हजार रुपये लंपास केला तर नरेश शिवलाल जयस्वाल यांचे किराणा दुकाना चे शटर तोडून आठ हजार नगदी तर वीस हजाराचा सुका मेवा काजू बदाम,मनुका सारखे महागडे सामान चोरट्यानीं पळविले तर तिसरे एक मोबाईल गँलरी फोडण्याचा प्रयत्न झाला तर एका मेडिकल दुकानातून हि काही सामान चोरीला गेले.त्याच बरोबर गावातील मध्यवस्तीत असलेले विठ्ठल वानखेडे हे काही कामा निमित्ताने बाहेरगावी गेले असल्याने त्याच्या घरी कोणी नसल्याची संधी साधुन यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील सामानाची फेकफाक करून कपाटाचे कुलूप तोडण्यात आले परंतु चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही.गावावरून परत आल्यावर हा सर्व प्रकार त्यांच्या निर्दशनात आला.
गेल्या काही दिवसांपासून फुलसवांगीत भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.पोलिसांचा वचक कमी झाला कि काय असा सवाल असा सवाल आता सर्वसामान्य करत आहेत.वरील चोरीच्या घटनेत चोर सी सी टीव्ही फुटेजमध्ये एकदम स्पष्टपणे दिसत आहेत,यासाठी एक पथक आरोपी च्या शोधात निघाले असून त्यामध्ये पि.एस.आय पुजलवाड,व हे.कॉ.मुन्ना आडे यांच्यासह इतरांचा समावेश आहे.
या सर्व चोरींच्या घाटनेची महागाव पोलिसात तक्रार देण्यात आली असून महागाव चे ठाणेदार खंदारे यांचे मार्गदर्शनात दिनेश आडे,मुन्ना आडे, बालाजी मार्कंड,गजानन राठोड पुढील तपास करी आहेत.