उमेदच्या अधिकाऱ्याकडून मानधन देताना पशु सखी व आय.सी.आर .पी . महिला कर्मचारी यांना मानसिक त्रास

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील रिधोरा गावालगत असलेल्या विहीगाव येथिल एका पशु सखीचे मानधान २०२० पासून देण्यात आले नाही तर धानोरा येथील एका आय.सी.आर. पी महिला कर्मचारी यांचे १८ महिन्याचे मानधन देण्यात आले नाही.सदर धानोरा येथील एका महिलेने तर सर्व संबंधित अधिकारी यांच्या कडे लेखी स्वरूपात तक्रार सुध्दा दाखल केली आहे परंतु अजूनही त्या महिलेला मानधन देण्यात आले नाही. धानोरा येथील महिलेने तर चेंक उपोषणाला बसणार असल्याचे सांगितले आहे परंतु त्या महिलेची प्रकृती ठीक नसल्याने ती महिला एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे समजले आहे. त्या नंतर ती महिला उपोषणाला बसणार असल्याचे सांगितले आहे अशा एक ना अनेक समस्या या उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सुरू आहे परंतु अजूनही या कडे कुणीही लक्ष देण्यास तयार नाही. सदर

राळेगाव तालुक्यांत उमेदच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बचत गट स्थापन करण्यात आले व त्यामाध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावे असे उद्दिष्ट आहे परंतु तसे न होता मर्जीतील बचत गटाकडे नविन प्रोजेक्ट दीले जाते व ते प्रोजेक्ट दोन महिन्यात बंद करण्यात येते व त्याचे अनुदान उमेद मधील अधिकारी हे हिस्से वाटप करून मोकळे होताना दिसत आहे. उमेद मधील राळेगाव तालुका प्रमुख व सी एल एम व सी सी यांच्या बोलण्यात मोठ्या प्रमाणावर तफावत दिसुन आली कारण एक अधिकारी म्हणतात ग्राम संघाचे अध्यक्ष हे पशु सखी यांच्या वेतनाचा अहवाल तयार करतात आणि दुसरे म्हणतात पशु सखी स्वतः अहवाल देतात आणि एक म्हणतात मानधन फिक्स आहे आणि दुसरे कामावर मानधन अवलंबून आहे त्यामुळे उमेद मध्ये पशु सखी यांना मानधन मिळण्यास विलंब होतो व मर्जीतील लोकांना काम न करता जास्तं मानधन व बाकीच्यांना कमी असा त्रास पशु सखी यांना उमेदच्या अधिकारि वर्गाकडून होत आहे. विहरगाव येथील एका पशू सखीचे मानधन २०२० पासून देण्यात आले नाही याबाबत अनेकदा उमेद कार्यालयाकडे मानधनासाठी मागणी केली परंतु अजूनही दीले नाही यावरून उमेद कार्यालयाचा कारभार बोगस असल्याचे चित्र आहे. पशु सखी यांना मानधन मागणीचा अहवाल कसा भरायचा याचे प्रशिक्षण उमेद कडून देण्यात आले की नाही ? मग आले असेल तर त्यांच्या कडून तसा अव्वाल मानधन मागणीचा पशू सखी कडून भरुन घ्यायला हवा होता पण तसे झाले नाही.असेही काही महिलांन कडून सांगितले जात आहे. तर पशु सखी यांना मानधन देताना मानसिक त्रास देत असल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे उमेदच्या बोगस कारभाराची चौकशी गटविकास अधिकारी राळेगाव व जिल्हा उमेद कार्यालयाकडून करावी व पशु सखी यांना मानधन वेळेवर व हकाचे मानधन द्यावे व राळेगाव उमेद कार्यालयाकडून पशु सखी यांना मानधन देताना मानसिक त्रास देऊ अशी मागणी महिलांन कडून होत आहे.