नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ केव्हा मिळणार ?

केंद्राच्या योजनेचे पैसे आले खात्यात मात्र राज्य सरकारच्या पैशाची शेतकऱ्यांना अपेक्षा

ऑगस्ट संपला सप्टेंबर सुरू झाला शेतकऱ्यांच्या खात्यात पहिला हप्ता नाही आला

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

राळेगाव: केंद्र सरकारकडून पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांना वर्षातून सहा हजार रुपयांच्या अर्थसाह्य दिले जाते चार महिन्यात दोन हजार रुपये प्रमाणे तीन वेळा रक्कम बँकेत जमा करणे सुरू आहे मात्र केंद्र सरकारच्या धरतीवर महाराष्ट्र राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांचा लाभ देण्याची घोषणा केली शासन निर्णय निर्गमित करण्यात आला मात्र अजूनही सदर योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नसल्याने शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या लाभाची प्रतिक्षा करू लागले आहे.
केंद्र सरकारच्या धरतीवर महाराष्ट्र राज्य सरकारने सुद्धा शेतकऱ्यांना प्रति वर्षी सहा हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. याबाबत मंत्रिमंडळात या योजनेला मंजुरी प्रदान करण्यात आली होती सदर योजनेअंतर्गत केंद्राप्रमाणे चार महिन्यात दोन हजार रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. पी एम किसान सन्मान निधीचे लाभार्थी शेतकरीच हेच राज्य शासनाच्या योजनेसाठी पात्र असतील असेही घोषित केले होते परंतु राज्य सरकारच्या निधीचा पहिला हप्ता अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नाही तेव्हा राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधीचा पहिला हप्ता सणासुदीच्या दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्यास शेतकऱ्यांना मदत होईल अशी अपेक्षा करीत असुन राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभाच्या प्रतिक्षेत दिसून येत आहे.
वर्षातील पहिला हप्ता म्हणून एप्रिल ते जुलै व दुसरा हप्ता आगस्ट ते नोव्हेंबर तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च या दरम्यान देण्याचे ठरविण्यात आले आहे केंद्र सरकारचा पहिला हप्ता जुलै च्या शेवटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे परंतु आगस्ट महीना संपला व सप्टेंबर सुरू झाला तरी राज्य सरकारच्या पहिल्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात आली नाही सध्या शेतातील खरीप हंगामाची कामे सुरू असुन शेतकरी खरीपाच्या कामात गुंतला असुन शेतकरी नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या हप्त्याची अपेक्षा करीत आहे.