
सहसंपादक : रामभाऊ भोयर
भारतीय संविधान दिवस हा संपूर्ण देशात साजरा करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यात येते, त्याच प्रमाणे या वर्षीसुद्धा 26 नोव्हेंबर रोजी युवा बुद्धीष्ट मंडळ चिखली (बुद्धविहार) तर्फे संविधान दिन उत्साहात व भव्यतेने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधानाच्या तैलचित्राला पंच कमेटी चे अध्यक्ष बंडुजी वनकर, सिद्धार्थ मंडळाचे अध्यक्ष विनोद वैरागडे व युवा बुद्धिस्ट मंडळ चे अध्यक्ष सुरज फुलमाळी, पोलीस पाटील कांचनताई घायवटे यांच्या हस्ते हारार्पण करून बुद्ध वंदना घेण्यात आली.नंतर संविधान उद्देशीकेचे वाचन लोकेश दिवे यांनी सामूहिकरित्या केले.व संविधान सन्मान दिन मिरवणूकीला
सुरवात करण्यात आली.
या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधानाच्या जिंदाबाद च्या घोषवाक्यानी आसमन्त निनादुन गेला होता. संविधान सन्मान दिन मिरवणूक बुद्धविहार येथून आठवडीबाजार मार्गे हनुमान मंदिर,नवीन वस्ती (बेघर ), भटकर पुरा व शेवट बुद्धविहार येथे सांगता करण्यात आली.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता क्षितिज घायवटे, साहिल वनकर, मयूर दिवे, आकाश वनकर, पवन वैरागडे तसेच युवा बुद्धीष्ट मंडळातील सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. सदर संविधान सन्मान दिन मिरवणूक कार्यक्रमाला गावातील नागरिक, भीम अनुयायी तसेच बौध्द उपासक, उपाशीका
यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
