शालेय विद्यार्थ्यांनसोबत साजरा केला हनुमंत थोटे यांनी आपला वाढदिवस

पोंभूर्णा तालुका प्रतिनीधी:- आशिष नैताम

पोंभूर्णा येथील प्रतिष्ठित नागरीक तथा ओम कॅफेचे संचालक श्री. हनुमंत थोटे यांनी आज दिनांक ४/०१/२०२३ ला आपला जन्मदिवस जि. प. उच्च प्राथमीक शाळा पोंभूर्णा येथील विद्यार्थ्यांनसोबत साजरा करीत समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे या धावपळीच्या जीवनात सर्वजण कुठेना कुठे गुंतलेले असतात मात्र हनुमंत थोटे यांनी आपला वाढदिवस शालेय विद्यार्थांनसोबत साजरा करन्याचे ठरवीले आणि शालेय विद्यार्थ्यांना मसालाभात, मठ्ठा व जिलेबीची स्वादिष्ट मेजवाणी देत आपला वाढदिवस साजरा केला या वेळेस चिमूकल्यांनीहि स्मीत हास्य देत सहकार्य दिला सर्वांनी खूप छान प्रकारे हनुमंत थोटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या आनंदमय सोहळ्यात शाळेचे मुख्याध्यापक श्री. कातकर सर, देवगडे , आवचट मॅडम, उरकुडे मॅडम यांनीआपले योगदान दिले या प्रसंगी शैलेश भंडारवार, आकाश तिरुपतीवार, आशिष नैताम, हेमंत उराडे, अक्षय बांभोळे व मित्रपरीवार उपस्थीत होते…