
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर
आज 3 मे रोजी गांधी चौकातील मुख्य बाजारपेठेत मनपाचे पथक कारवाई करण्यासाठी दाखल झाले. यावेळी येथील एका दुकानावर सदर पथकाने कारवाई करत दुकानाला ताला ठोकला मात्र दुकान सुरू नव्हते. त्यामुळे मनपाच्या या कारवाईच्या विरोधात येथील सर्व व्यापारी एकत्र आले. परिणामी काही वेळ या परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली. याची माहिती काही व्यापाऱ्यांनी आमदार जोरगेवार यांना दिली. लगेच आमदार जोरगेवार घटनास्थळी दाखल झाले. यावेळीं आमदार जोरगेवार यांनी मध्यस्थी करत वाद संपविला. मनपा प्रशासनाने कोणतीही कारवाई करत असताना माणुकीचा दृष्टीकोन लक्षात ठेवावा अशा सूचना यावेळी आ. जोरगेवार यांनी केल्यात. व्यापाऱ्यांची भूमिका नेहमी प्रशासनाला मदत करण्याची राहिली आहे. त्यामुळे त्यांना सन्मान जनक वागणूक दिल्या गेली पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले.
आ. जोरगेवार यांच्या मध्यस्ती नंतर महानगरपालिका प्रशासनानेही केलेली कारवाई मागे घेतली असल्याचे समजते .
