
सहसंपादक : रामभाऊ भोयर
स्व.वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात रुग्णाना अनेक समस्यांना समोरे जावे लागत असल्याने त्यांना मृत्यूकडे धकले जात आहे असे अखिल भारतीय महिला संवैधानिक हक्क परिषदेचे मत असून या रुग्णालग्णालयातील समस्यांचे निवारण त्वरित करण्यात यावे असे निवेदन मा. जिल्हाधिकारी यवतमाळ मार्फत मा. ना.आरोग्य मंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई याना अखिल भारतीय महिला संवैधानिक हक्क परिषदेच्या राज्याध्यक्ष मनिषा तीरणकर यांचे नेतृत्वात पाठवण्यात आले आहे.
यवतमाळ जिल्हा मा महाराष्ट्रातील आदिवासी बहुल जिल्हा असून येथे श्री. वसंतराव नाईक हे शासकीय रुग्णालय आहे. या रुग्णालयात या जिल्ह्यासहित महाराष्ट्रातील अनेक विभागातू इलाज करण्यासाठी रुग्ण येत असतात.असे असतांना या रुग्णालयात अनेक सुविधा अपुऱ्या पडत आहे,त्यामुळे रुग्णाना अनेक समस्यांना तोंड द्यावा लागते आहे. औषधीचा तुटवडा,वेळेवर न होणारा इलाज,रुग्णाकडे डॉक्टराकडून होणारे दुर्लक्ष,वार्डातिल अस्वच्छता, सिकलसेल रुग्णाना वेळेवर रक्तपुरवठा न होणे,रुग्णाना स्वच्छ व फिल्टर पाणी पुरवठा न होणे अशा अनेक समस्या या रुग्णालयात असून याकडे रुग्णालय प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे,त्यामुळे रुग्णाना मृत्यूचा सामान करणे भाग पडत असल्याचे मत अ.भा.महिला संवैधानिक हक्क परिषदचे मत आहे. समस्या नाही सुटल्या तर मोठ्या प्रमाणात आंदोलन सुद्धा करन्यात येईल असा इशारा सुद्धा देण्यात आला.
मनीषाजी तिरणकर याचे नेतृत्वात आरोग्य मंत्र्यांकडे पाठवण्यात आलेल्या निवेदनात सौ.कुसूम देवतळे,श्रीमती जिजा तलवारे,योगिता येंडे, दिपावली येंडे, स्नेहा काळे,स्नेहा होले,ईसू माळवे इत्यादींच्या सह्या आहे.
