वर्धा जिल्ह्यातील बेलदार समाजाच्या युवतीवर अत्याचार करणाऱ्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी

हिमायतनगर तालुका प्रतिनिधी : प्रशांत राहुलवाड

वर्धा जिल्ह्यातील तळेगाव येथे बेलदार समाजातील संगीता हिम्मत मोहिते वय 16 वर्ष अल्पवयीन युवतीवर काही आरोपी नराधमांनी अत्याचार करून व तिच्यावर ऍसिड टाकून तिला जीवे ठार मारून विहिरीत टाकण्यात आले..
या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण बेलदार समाज आक्रमक झाला आहे, या प्रकरणाला आठ ते दहा दिवस झाले तरी आरोपी नराधमांवर कठोर कार्यवाही झाली नाही. आरोपीवर कठोरात कठोर कार्यवाही व फाशीची शिक्षा देण्यात यावी या करिता किनवट तालुक्याच्या वतीने बेलदार भटका समाज संघ किनवट तालुका युवा अध्यक्ष अंबादास चव्हाण व समाजातील इतर समाज बांधवांनी किनवट येथील उप सहाय्यक जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले.

वर्धा जिल्ह्यातील तळेगाव येथील संगीता हिम्मत मोहिते या अल्पवयीन मुलीवर लैंगिक छळ करून तिची क्रूर हत्या करण्यात आली एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर तिच्यावर ऍसिड टाकून तिला विहिरीत टाकण्यात आले.
हे कृत्य करणाऱ्या नराधमाचा खटला फास्टट्रॅक अंतर्गत न्यायालयात चालवून नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीचे निवेदन किनवट तालुका बेलदार भटका समाज संघाच्या वतीने सहाय्यक जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आले
या निवेदनाद्वारे बेलदार समाजातील मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात न्याय जर मिळाला नाही तर समस्त महाराष्ट्रातील बेलदार भटका समाज संघ आक्रमक पवित्रा घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही असे किनवट तालुका युवा अध्यक्ष अंबादास चव्हाण यांनी सरकारला इशारा केला आहे
संपूर्ण महाराष्ट्रातील बेलदार समाज बांधवांची संगीता हिम्मत मोहिते हिला न्याय मिळावा व आरोपी नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी ही मागणी संपूर्ण समाजाची आहे..
निवेदनावर युवा तालुकाध्यक्ष अंबादास चव्हाण, तालुकाध्यक्ष संजय चव्हाण, अर्जुन जाधव, दिनेश जाधव, बालाजी चव्हाण, दत्तराम चव्हाण,परमेश्वर पवार, अशोक मोहिते, अमोल जाधव,सुशील पवार, प्रल्हाद चव्हाण, ब्रह्मा साळुंखे, पवन साळुंखे, आनंदराव जाधव, यांच्या सह बेलदार समाजातील अनेक युवकांच्या स्वक्षऱ्या आहेत…