
आज दिनांक 13/09/2024 शुक्रवार रोजी श्रीराम गणेश मंडळाच्या वतीने श्रीराम मंदिर फुलसावंगी येथे भव्य रक्तदान व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराला उद्घाटक म्हणून श्री गणेश उदावंत तर प्रमुख पाहुणे म्हणून योगेश वाजपेयी,मुन्ना नाईक,डॉ.अबू भैया कुंदन,कुणाल नाईक,अरुण भाऊ धकाते,अमर भाऊ दळवी,अशोक बाजपेयी,विठ्ठल सोनूने यांची उपस्थिती होती या शिबिरामध्ये एकूण 40 तरुणांनी रक्तदान दिले व 100 च्या वर नेत्र तपासणी शिबिर करून त्यांना चष्मा वाटप करण्यात आले तसेच आयुष्यमान भारत कार्ड व आभा कार्ड 200 च्या वर लोकांना काढून देण्यात आले श्रीराम गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सव दरम्यान सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात त्याच अनुषंगाने यावर्षी मंडळाच्या वतीने सर्वसामान्य लोकांना आयुष्यमान कार्ड आबा कार्ड मोफत काढून देणे रक्तदान शिबिर नेतृत्व तपासणी शिबिर व महाप्रसाद येथे आयोजन करण्यात आले त्यांच्या सर्वसामान्य लोकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.
शिबिराला विविध मान्यवरांची भेट
रक्तदान व नेत्र तपासणी शिबिराला गावातील डॉ.चंदन भैया पांडे,विजयराव महाजन,विशाल भैया नाईक,डॉ मयूर मस्के व भाविक जी भगत यांनी भेट देऊन श्रीराम गणेश मंडळाच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
श्रीराम गणेश मंडळाचे अध्यक्ष आनंद श्रीरामजवार,उपाध्यक्ष नितीन सूर्यवंशी,सचिव मयूर मासाळ,सदस्य आनंद जाधव,लखन घोडे,पवन दळवे,शिवम शेळके,शुभम वैद्य,आदित्य बालस्कर,स्वप्निल ढाले,ओम काटोले,अनिकेत देवतराशे,अक्षय वानखेडे,पार्थ पेन्शनवर,आकाश मासाळ,प्रथमेश भडांगे,रवी हजारे,साई पुलजवार,सुमित ढाले,अविनाश शिंदे,गजानन शिंदे,प्रीतम वाघमारे,ओम छन्नीकर गजानन जगताप व सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेऊन शिबिर यशस्वी केले.
