
सहसंपादक : रामभाऊ भोयर
बुलढाणा जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा बसविण्याच्या पार्श्वभूमीवर समाजकंटकाकडून महिलांवर झालेला हल्ला हा महाराष्ट्राच्या परंपरेला काळीमा लावणारा आहे अशा या भ्याड हल्ल्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे या हल्ल्याप्रकरणी हल्लेखोरांवर कायदेशीर कठोर कार्यवाही करणे महिलांना मारझोड करणे, त्याचे कपडे फाडणे, त्यांना अपमानित करणे, ही घटना निंदनीय आहे.निषेधार्य आहे या प्रकरणाला जातीय रंग देऊन समाजा, समाजात तेढ निर्माण करणार्या प्रवृत्तीला वेळीच ठेचून काढणे व पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटनांना पाय बंद घालण्यासंदर्भात शिवसेनेकडून तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री यांना पत्र देण्यात आले. राळेगाव तालुका प्रमुख विजय पाटील, शहर प्रमुख शंकर गायधने, राळेगाव शहर संघटिका महिला आघाडीच्या पार्वता मुखरे, तालुका संघटक प्रशांत वा-हेकर उपस्थित होते तर उपशहर प्रमुख श्रीकांत कोदाणे, सुनिल क्षिरसागर, महेंद्र तुमाणे, योगेश मलोंढे,धनराज श्रीरामे, सुधाकर चंपत शिखरे, प्रभाकर धोटे, महादेवजी मुखरे,देवराव नाखले, कृष्णा जानराव नागोसे,शंतनू सहारे पत्रात इत्यादींच्या स्वाक्षरी आहेत.
