आजंती येथील साईकृपा जिनिंगच्या मालकाकडून मृत कामगाराच्या कुटुंबीयांवर अन्याय,कंपनी मालक व अधिकाऱ्यांचे संगणमत

अद्याप मिळाली नाही कुठलीही मदत.

हिंगणघाट:- २५ नोव्हेंबर २०२३
०२ ऑक्टोबरला साईकृपा जिनिंग आजंतीमध्ये रामकृष्ण पुरूषोत्तम भजगवळी रा.मुजुमदार वार्ड, हिंगणघाट हा हमालीचे काम करत असताना मरण पावला असुन त्याच्या कुटुंबाला कंपनीकडुन २५ लाख रूपयाची मदत मिळण्याबाबत नगरसेवक सौरभ तिमांडे सह मृत कामगाराच्या कुटुंबीयांनी तसेच कामगारांच्या वतीने कामगार मंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी वर्धा यांना निवेदन देण्यात आले.
१० ऑक्टोंबर २०२३ ला हिंगणघाट शहरातील कामगारांच्या वतीने नगरसेवक सौरभ तिमांडे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाव्दारे कंपनी मालकासोबत बैठक लावून तोडगा काढण्यासंबंधी मागणी केली असता त्यावेळी बैठक बोलावून तोडगा काढण्यासंबंधीचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु आजपर्यंत कुठल्याही प्रकारची मदत साईकृपा कंपनी मालकाकडून कामगाराच्या कुटुंबीयांना मदत देण्यात आली नाही.
कंपनी मालक व अधिकारी यांच्या संगणमताने हे प्रकरण दाबण्याचा प्रकार होत असल्याचा आरोप मृत कामगाराच्या वाडलानी केला आहे.
दिनांक ०२ ऑक्टोबर २०२३ ला रामकृष्ण पुरूषोत्तम भजगवळी वय ३६ वर्ष हा साईकृपा जिनिंग आजंती मध्ये हमालीचे काम करताना दुपारी ०१.०० ते ०१.३० वाजताच्या दरम्यान मरण पावला.
शंकर मैंद व इतर हमाल त्यावेळेस जिनिंग मध्ये हजर होते. साईकृपा जिनिंगचे मालक स्वतः गाडी चालवत सरकारी दवाखाना हिंगणघाट मध्ये रामकृष्ण भजगवळी याला आणले असतांना डॉक्टरने त्याला मृत असल्याचे घोषित केले.
रामकृष्ण भजगवळी हा हमालीचे काम करीत असतान साईकृपा जिनिंगमध्ये जागेवर मरण पावला त्याचे वय ३६ वर्षाचे असुन पत्नी एक मुलगा दोन मुली आहेत. त्यांचे राहणे मुजुमदार वार्डातील झोपडपट्टति असुन परिस्थिती हलाकीची आहे.
तरी मृत कामगाराच्या कुटुंबीयांना मदत देण्याकरता कंपनी मालकासोबत बैठक लावून त्याच्या कुटुंबाला जगण्यासाठी साईकृपा जिनिंगच्या मालकाकडुन २५ लाख रूपयाची मदत देण्यात यावी तसेच त्याच्या मृत्युची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यावेळी करण्यात आली.


प्रतिक्रिया :- मृत कामगाराचे वडील पुरुषोत्तम भजगवळी यांची प्रतिक्रिया.


साईकृपा जिनिंगच्या मालकाकडून आर्थिक मदत तसेच मृत्यूची सखोल चौकशी करावी आम्हाला न्याय मिळाला नाही तर येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये कामगार मंत्र्यांची भेट घेणार आहो कारण कंपनी मालक व अधिकारी यांनी संगणमत केले असून आमच्यावर अन्याय करत आहे असा आरोप ग्रुप कामगाराचे वडील पुरुषोत्तम भजगवळी यांनी केला आहे.