
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
कीन्ही जवादे ग्रामपंचायत तर्फे कीन्ही येथील दोन अंगणवाडीला गॅस सिलेंडर व शेगडी देण्यात आली.यापुर्वी लहान मुलांचा आहार चुलीवर होत असल्याने त्याचे धुराचा त्रास लहान मुलांना होत होता,व वेळ जात होता.ही बाब लक्षात घेऊन ग्रामपंचायत कीन्ही जवादे यांनी अंगणवाडी ला गॅस सिलेंडर शेगडी देण्याचा निर्णय घेतला.यावेळी सरपंच सुधीर जवादे, उपसरपंच रमेश तलांडे, ज्येष्ठ नागरिक विठ्ठलराव सिडाम, अंगणवाडी सेविका सुशीलाताई वाढई, पुष्पाताई सिडाम, अंगणवाडी मदतनीस रुपाताई उईके,वर्षाताई लोणबले, ग्रामपंचायत कर्मचारी पुंडलिकराव लोणबले, मारुती ईठाळे उपस्थित होते.
