

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
रावेरी येथे आज राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी चा सोहळा रावेरी येथे पार पडला,त्यामध्ये महिला भजन मंडळी, तुकडोजी भजन मंडळी, अवधूत भजन मंडळी व समस्त रावेरी गावकरी मंडळी यांनी आयोजित केला त्यामध्ये सीता माता भजन मंडळ रावेरी,अंजना माता भजन मंडळ रावेरी, आदर्श गुरुदेव सेवा महिला भजन मंडळ रावेरी, दुर्गा माता भजन मंडळ रावेरी,दुर्गा माता भजन मंडळ पोहना, संतोषी माता भजन मंडळ रामतीर्थ, बाल गुरुदेव सेवा भजन मंडळ आपटी रामपूर, गुरुदेव शिवा भजन मंडळ किनवट घोडे,जय बजरंग भजन मंडळ किनवट व गावातील प्रतिष्ठित नागरिक व समस्त रावेरी गावातील महिला मंडळी बालमंडळी युवा मंडळी यांनी मोठ्या उत्साहा ने गावामध्ये टाळ मृदुंगाच्या अनादात सितमाता मंदिर येथून शोभायात्रा काढून संपूर्ण गावात फेरी करून साजरा केला, या कार्यक्रमा करिता विषेत्ता मनजे गावातील महिला मंडळींनी संपूर्ण गाव झाडून स्वच्छ साफ सफाई केली, गावातील प्रत्येक घराच्या समोर रांगोटी काढलेली होती तसेच प्रत्येक चौकात दिंडीतील मंडळींना नास्था व चहा पाण्याची व्यवस्था गावकऱ्यांनी स्वतःहून केली व सितामांदिर येथे कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
