
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राज्यात विविध पक्षांतून होत असलेल्या प्रवेश-निर्गमनांच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातील जनतेचा ओढा पुन्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडे वळताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर दिनांक 1 नोव्हेंबर 2025 रोजी यवतमाळ येथे माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंतराव पुरके यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
या प्रवेश सोहळ्यात माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. निमिष मानकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजय तेलंगे, आशिष मानकर, नरेंद्र नंदुरकर, नरसिम्हाराव रानडे, हरीभाऊ भोयर, कवडूजी पेंदोर, रामभाऊ सोयाम, राजेश पेंदोर, बाबाराव धुर्वे, भिमराव सलाम, मनोहर ताकसांडे, देव आडे, विजय राठोड, दिलीप घोडाम, नागोराव आत्राम, काशिनाथ जुमनाके, मोहन चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा झेंडा हातात घेतला.
या प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणात चांगलाच बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसकडे वाढत चाललेला लोकसमर्थनाचा ओघ पाहता, सत्ताधारी पक्षाच्या गोटातही चिंतेची भावना निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
या प्रसंगी खासदार प्रतीभाताई धानोरकर, माजी मंत्री माणिकराव ठाकरे, माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंतराव पुरके, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, जिल्हाध्यक्ष अॅड. प्रफुल्लभाऊ मान्यवर, आमदार बाळासाहेब मांगुळकर, माजी आमदार वामनराव कासवार, मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनिष पाटील, शहराध्यक्ष बबलू देशमुख, अरविंद वाढोणकर, जितेंद्र मोघे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या भव्य प्रवेशामुळे काँग्रेस पक्षाला जिल्ह्यात नवे बळ प्राप्त झाले असून, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत याचा प्रभाव निश्चितपणे दिसून येईल, असा विश्वास काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. प्रवेशितांचे सर्वत्र हार्दिक स्वागत व अभिनंदन करण्यात येत आहे.
