पोंभूर्णा तालुक्यात वाघाची दहशत कायम ,वनविभागाचे शर्तीचे प्रयत्न मात्र अपयशी

मागील कित्येक दिवसापासून पोंभूर्णा तालुक्यात पट्टेदार वाघाने धुमाकुळ घातला असून जनजीवन भयभीत झाले आहे वनविभाग पोंभूर्णा कडून या नरभक्षी वाघाला जेरबंद करन्याकरीता अनेक शर्तीचे प्रयत्न केल्या जात असून अजून तरी या नरभक्षी वाघाला जेरबंद करन्यात मात्र वनविभागाला अपयश आले आहे मागील आठवड्यात कसरगठ्ठा येथील महिलेला वाघाच्या हल्यात आपला जीव गमवावा लागला त्यातल्या त्यात दोन इसमहि वाघाच्या हल्यात जखमी झाले या सर्व घटना ताज्या असतानांच आज दुपारी १:०० वाजताच्या सुमारास कवीटबोळी शिवारात दोन शेळ्यावंर हल्ला करून वाघाने ठार केल्या या वारंवार घडणार्या घटनामुळे नागरीकांत भीतीचे वातावरन पसरले असून वनविभाग या नरभक्षी वाघाला कधी जेरबंद करनार आणि पोंभूर्णा तालुक्यातील भयभीत नागरीक कधी मोकळा श्वास घेणार याकळे सर्वांचे लक्ष लागून आहे