मारेगाव तालुक्यातील वेगाव परिसरात आढळले वाघाचे ठसे; नागरिक भयभीत

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

मारेगाव तालुक्यातील वेगाव परिसरात असलेल्या (उमरदेव) जगन्नाथ बाबा मंदिर जवळ एका शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वाघाच्या पायाचे ठसे आढळल्याने परिसरात शेतमजूर व शेतकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या कापूस वेचणीचा हगाम सुरू असल्याने शेतकरी व मंजूर शेतामध्ये वाघाच्या भिती ने कापूस वेचणीसाठी व शेतकरी शेताचे काम करणासाठी वाघाच्या भीती ने जाण्यास तयार नसल्याने वनविभागाने परिसरात वाघा शोध घेवुन वाघाला जेल बंद करण्याची मागणी शेतकरी व शेतमजूरा कडुन केली जात आहे. मागील दोन वर्षांपूर्वी मार्डी, पिसगाव, चिंचमंडळ, चिंचाळा साल्लेभेटटी परिसरात वाघाने धुमाकूळ घातला होता.