क्रांती दिनाच्या निमित्ताने विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करण्यासाठी नागपूर विधान भवनावर “‘झेंडा आंदोलन “‘ शेकडो विदर्भवादी जेलमध्ये

.
सहसंपादक : रामभाऊ भोयर


आगष्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने विदर्भ राज्य आंदोलन समीती चे हजारो विदर्भवाद्यांनी केले विधान भवनावर “‘ विदर्भाचा झेंडा आंदोलन”‘ या साठी संपूर्ण विदर्भातून हजारो विदर्भवाद्यांनी महिला पुरुष तरुण युवकांनी पुढाकार घेतला होता यवतमाळ जिल्ह्यातील हजारो विदर्भ प्रेमी आंदोलनात मा.कृष्णा भोंगाडे जिल्हा अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समीती यवतमाळ आणि मा.मधुसुदन कोवे गुरुजी जिल्हा उपाध्यक्ष यांच्या नेतृत्त्वात सहभागी झाले होते.”‘अब की बार विदर्भ की सरकार “‘ भाजप काँग्रेस हद्दपार एकच नारा जोर जोराने विधान भवनावर धुमत होता. यशवंत मैदान ते विधान भवन या दुतर्फा रस्त्यावर हजारो विदर्भवाद्यांनी घेरले होते या तिव्र आंदोलनात सर्व सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक टि वी चेनल नी विदर्भ राज्य आंदोलन समीती च्या “‘ झेंडा ध्वजारोहण”‘ दखल घेतली होती या जेल भरो सविनय कायदे भंग लांग मार्च आंदोलनात सहभागी विदर्भावादी नेते ॲड.वामनराव चटप, साहेब श्रीमती रंजना मामर्डे देशोन्नती संपादक मा प्रकाश पोहरे,मा मधुसूदन कोवे गुरुजी मुकेश मासुरकर कृष्णा भोंगाडे हिम्मतराव देशमुख अरुण जोग श्रीधर ढवस राजेंद्र झोटींग गजानन ठाकरे समिर शिंदे लता जयस्वाल रेखा निमजे मृणाल मोरे नितीन ठाकरे हजारो विदर्भवादी या आंदोलनात सहभागी झाले होते.