
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे हे शहर शिक्षणासाठी प्रसिद्ध शहर ओळखले जाते.खेडेगावातून शिक्षण घेण्यासाठी शेकडो मुले-मुली शहरात येतात.
परसोडी रोडवर औद्योगिक प्रशिक्षण संस्था,शासकीय मुलींचे वसतिगृह, फार्मसी कॉलेज असल्याने धामणगाव पासून अंतर दूर असल्याने सायकल कीवा पायदळ मुलें-मुली जातात याचा फायदा घेत बायपास रोडवर सकाळ पासून घरून सोडलेले चिडीमार आपल्या लक्षाला टारगेट करून चक्क मुलीला तु गाडीवर बस तुला कॉलेज सोडून देतो नाही तर तुला पाहून घेऊ
अशी तक्रार अनोळखी मुला विरुद्ध मुलींनी आय.टी.आय.च्या महिला प्राध्यापका जवळ केल्याने व वारंवार हा प्रकार होत असल्याने पोलिसांनी अशा निवडक ठीकाणी गस्त घालने गरजेचे.
आजची युवा पिढी व्यसनाधीन होत चालल्याने आपली जबाबदारी विसरत चालल्याने पुन्हा निर्भया सारखा प्रकार होऊ नये यासाठी स्त्रियांना मानाने जगू द्या.
महिला व मुलींना कोणी त्रास देत असेल तर महाराष्ट्र पोलिसांच्या *११२* या नबंरच्या पोलिस व्हँनवर फोन करून आपली तक्रार करुन त्त्वरीत मदत मिळवा.
