शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम कधी मिळेल ?

  • Post author:
  • Post category:इतर

प्रवीण जोशी/ढाणकी
शेतकऱ्याची या वर्षी कधी भरून न निघणारी हानी झाली गेलेला हंगाम मुळीच वापस येणार नाही पण काही रक्कम विमा कंपनीने दिल्यास येणाऱ्या रब्बी हंगामाला कामाला येईल. यवतमाळ जिल्ह्यातील 33 टक्के पेक्षा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा योजना यांचे अंतर्गत दिली जाणारी आग्रमी 25 टक्के रक्कम कधी मंजूर होईल याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष सदरील साल जून 2022 ते ऑगस्ट या काळात ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होऊन संपूर्ण पीक नष्ट झाले आणि त्यानंतर जवळपास वीस दिवस पावसाचा खंड पडला या खंडामध्ये सोयाबीन पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत होते आणि कापूस शेती बोंडे लागण्याच्या अवस्थेत होते सदरील काळात पावसाचा खंड झाल्यामुळे पिकाचे नुकसान झाले,सरकारच्या नियमानुसार ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान असलेल्या शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक योजनेअंतर्गत नांदेड, अकोला आणि लातूर या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 33% पेक्षा जास्त नुकसान असलेल्या जिल्ह्यातील मंडळाला 25% अग्रमी रक्कम जिल्ह्यातील विमा कंपनींना शेतकऱ्यांना देण्याचे आदेश दिले, याचप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विम्याची अग्रणी स्वरूपातील रक्कम संबंधित विमा कंपनीला देण्याचे आदेश माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी लवकरात लवकर देऊन शेतकऱ्याच्या पुढच्या हंगामाला हातभार लावावा.