एस टी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या समर्थनात मनसे चे अर्धनग्न आंदोलन

  • Post author:
  • Post category:इतर

उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एस टी कर्मचाऱ्याच्या मागण्यासाठी बसस्थानका समोर अर्धनग्न आंदोलन-मनिष डांगे
एस टी कर्मचाऱ्यांच्या विलीनकरणासह इतर मागण्यासाठी गेल्या दीड महिन्यापासून दुखवटा (संपवार) असून शासनाने कित्येक कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित केले आहे एस टी कर्मचारी संघटनाच्या मागण्या साठी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी आपला संपूर्ण पाठींबा जाहीर केला असून मनसे च्या वतीने राज्यात,ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे वाशीम जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या नेतृत्वात शासनचा निषेध काळ्या पट्ट्या बांधून,जिल्हाधिकारी कार्यालयावर ढोले,डफडे वाजून शासनाचे लक्ष वेधले तरी एस टी कर्मचाऱ्याच्या मागण्याची त्वरित पूर्तता करून एस टी सेवा पुर्ववत सरू करावी यासाठी मनसे च्या वतीने उद्या वाशीम बस स्थानका समोर अर्धनग्न आंदोलन करण्यात येत आहे असा ईशार देण्यात आला आहे यावेळी महाराष्ट्र सैनिक कृष्णा इंगळे मोहन कोल्हे अमोल मापारी ऋषिकेश इंगळे यश चव्हाण पवन डुबे प्रतिक कांबळे प्रकाश कवडे सौ बेबी धुळधुळे यांनी जिल्हाधिकारी आगार व्यवस्थाक यांना निवेदन देऊन दिला आंदोलनात वाशीम रिसोड आगारचे कर्मचारी सहभागी होणार आहे