पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची धाकधुक वाढली.

निवघा बाजार ( कृष्णा चौतमाल प्रतिनिधी )

चालू हंगामात सरासरी पेक्षा अधिक झाल्याने शेतकऱ्याच्या शेतातील पिकाची अवस्था केविलवाणी झाली होती.
यातून कसेबसे सावरत शेतकऱ्यांनी काही प्रमाणात पिकाला सावरून घेतले , मागील पंधरा दिवसापासून पावसाने अखंडपणे उखडीप दिल्याने फुला शेंगावर आलेले सोयाबीन चाफु या फुलावर आलेला कापूस सध्याच्या परिस्थितीत दुपारच्या वेळी माना टाकताना दिसून येत असून पिकाच्या फळ धारणा व फुल धरणाच्या काळात पावसाने पंधरा दिवसापासून दडी मारल्याने शेतकऱ्यासह पिकाची अवस्था केविलवानी झाली आहे.
चालू हंगामात मागील काळात सरासरी पेक्षा अधिक पुस झाल्याने ओल्या दुष्काळाचे साव ट निर्माण झाले असताना उरल्या सुरल्या पिकाची अवस्था आता पावसाने पंधरा दिवसा पासून उघडीप दिल्याने उत्पादनावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाची केविलवाणी अवस्था झाली आहे. अशा संकट मय समयी सरकार मायबाप जगाचा पोशिंदा याला कितपत मदत देते याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाल्याचे दिसून येत आहे.