जातीय द्वेषभावनेतून झालेल्या हत्येच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी, च्यावतीने राळेगाव येथे तीव्र जाहीर निषेध ,भव्य रॅली काढुन तहसिलदार यांना दिले निवेदन.

सहसंपादक: रामभाऊ भोयर

नांदेड येथे झालेल्या अक्षय भालेराव या भिमसैनिकाची भिम जयंत साजरी का करण्यात आली या कारणाने काही जातीवादी समाज कंटकानि निघृण हत्या करण्यात आली. तसेच
कु. हिना मेश्राम ही अकोला येथील बैद्ध मुलगी मुंबईला सावीत्रीबाई फुले वस्तीगृहात शिकत होती तीच्यावर अनैतिक कृत्य करुन तीचीही हत्या करण्यात आली. बौद्ध समाजावर वारंवार होणारे अत्याचार थांबवावे याकरीता विविध मागण्या घेऊन राळेगाव तालुक्यातील अनेक भिमसैनिक रसत्यावर उतरले झालेल्या प्रकरणाची सखोल चौकशी करुन आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, शिकणारया मुलींना संरक्षण द्यावे पिडित कुटुंबातील व्यक्तीला सरकारी नोकरीत सामावून घ्यावे, शासनाने आर्थीक मदत द्यावी, आरोपीवर ॲट्रीसिटी अॅक्ट लागू करावा, मुलींच्या वस्तीगृहात सी.सी.टीव्ही कॅमेरे लावण्यात यावे, या दोन्ही घटना माणुसकीला काळीमा फासणाऱ्या
असुन याचा न्याय निवाडा जलदगती न्यायालया मार्फत लावून आरोपिला फाशीची शिक्षा व्हावी असा आशयाचे नीवेदन मा. राष्ट्रपती, मा.गृह राज्यमंत्री, माराज्यापाल यांना तहसीलदार राळेगांव यांच्या मार्फत देण्यात आले.
यावेळी, वंचित बहुजन आघाडी, भिमटायगर सेना, भारतीय बौद्ध महासभा व इतर सामाजीक संघटनांनी सहभाग नोंदवीला. निवेदनावर वंचित बडुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष धनराजजी लाकडे, व. ब. आ
राळेगांव विधानसभा अध्यक्ष डॉ.ओमप्रकाश फुलमाळी, वं. ब. आ राळेगांव ता. अध्यक्ष विकासभाऊ मुन, महासचिव
प्रकाश कळमकर, भिमटायगर सेनेचे
ता. अध्यक्ष प्रविण कांबळे, भारतीय बौद्ध महासभेचे सरचिटणीस दिपक भाऊ आटे, राऊल उमरे, भगवान डोफे , वं. ब. आ. यवतमाळ जिल्हा चे अध्यक्ष लंक्षमिकांत लोळगे, वं. ब. आ यवतमाळ चे जिल्हा महिला अध्यक्ष धम्मावतीताई वासनिक, शिवदासजी कांबळे घ्यांच्या सह्या आहे.

निषेध रॅलीमध्ये, प्रामुख्याने इंद्रजित लभाने, गोवर्धन वाघमारे, अंकुश मुनेश्वर, रमेश लडे , धम्मानंद तागडे, संगीता नगराळे, सुकेशनि नगराळे, अॅडवोकेट दिक्षांत खैरे, उमेश कांबळे, भिमरावजी वागदे, सुरंज वाघमारे, सुरेखा वाघमारे, अनिता भरणे, अजय दारुंडे, चंद्रगुप्ता भगत ,प्रवीण कांबळे,धनविज भाऊ वाठोडा, प्रतिभा वरडकर, अजय फुलमाळी, प्रमोद गायकवाड, राजु गोटे, शैलेश
वेळेकर, सुधाकर लोहवे, निर्माता लभाने, वंदना उरकूडे, सरला चचाणे, सुमीत भरणे, दुर्गा जावळेकर, मंदा कांबळे, सत्यप्रभा भगत, संतोष घणमोडे, राजू बेताल
ज्ञानेश्वर डोफे, प्रशांत लाकडे, प्रशांत भगत,
शरद फुलमाळी, शितल नगराळे, प्रेमीलाबाई कांबळे, मधुमती लाकडे, अस्मीता मुन, सविता कांबळे ,साधना धनविज, शशिकला नगराळे, चंद्रलेखा बुरबुरे, सुमेध शंभरकर, शिवशंकर गांजरे निर्मला ओंकार, दिक्षा नगराळे, मनोज भगत, अमोल थुल इत्यादी असंख्य भिमसैनिक निषेध रॅलीत सहभागी होते.