
उपविभागीय पोलीस अधीकारी एका बेपत्ता प्रकरणाचा शोध घेत असताना मिळालेल्या माहितीनुसार वरोरा शहरात एक चौदा वर्षीय मुलगी संशयितरित्या फिरत असताना आढळली असता तिची पोलिसांकडून कसून चौकशी केली असता तिने मी ग्राहकाला भेटण्यासाठी आले असल्याचे सांगितले.तिच्यावर जबरदस्ती करून तिला देह व्यापार करण्यास भाग पाडत असल्याचे तिने सांगितले .जर देह व्यापार करण्यास नकार दिला तर तिला मारहाण करत असल्याचे तिने सांगितले. अल्पवयीन मुलीने दिलेल्या माहितीनुसार एक 22 वर्षीय महिला व एक पुरुष एजेंट यांना अटक केली.मागील महिनाभरापासून हा प्रकार वरोरा शहरात चालत असल्याचे पीडित अल्पवयीन मुलीने सांगितले .
चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीला देह व्यापार करण्यास भाग पडणाऱ्या आरोपीविरुद्ध देहव्यापार ,पोस्को कलम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून या प्रकरणात एकूण 11 आरोपी आहेत.यातील 10 आरोपी काल रात्रीच पोलिसांनी ताब्यात घेतले असून एक आरोपी जेल मध्ये असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांनी दिली.
