दिवाळीचा मुहूर्त हुकला आनंदाचा शिधा झोळीत आलाच नाही

  • Post author:
  • Post category:इतर
9

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

राज्य शासनाने आगामी गौरी गणपती दिवाळी या दोन्ही सणाचा उत्साह वाढवण्यासाठी रेशन लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा देण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते त्याप्रमाणे तालुक्यात गौरी गणपती च्या या काळात आनंदाचा शिधा मिळाला त्यानंतर शासनाने दिवाळी सणाला आनंदाचा शिधावाटप करण्यात येणार असून यात आनंदाची बाब म्हणजे शंभर रुपयात साखर रवा डाळ आणि तेल या वस्तूसह मैदा आणि पोहे देखील देण्यात येणार असल्याचे सांगितले असता लाभार्थ्यांना असे वाटले की दिवाळी हा सण चांगल्या तऱ्हेने साजरा करता येईल म्हणून गोरगरिबांना आनंद झाला परंतु दिवाळी सण आला तरीही आनंदाचा शिधा गोरगरिबांच्या पदरात पडला नसल्याने तालुक्यातील गोरगरिबांच्या पदरी निराशाच पडली असून त्यांच्या घरी ना गोड ना धोड मात्र राज्य शासनाची नुसतीच बोंबाबोंब अशी परिस्थिती दिसून येत आहे.
सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्थेअंतर्गत अंतोदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांना दिवाळीच्या औचित्यावर आनंदाचा शिधा या धर्तीवर गौरी गणपती व दिवाळी या सणासाठी गोरगरिबांना शंभर रुपयात जीन्स संच देण्याचे ठरले होते त्याप्रमाणे गौरी गणपती सणाला शिधा वेळेवर मिळाला त्यानंतर महाराष्ट्रात दिवाळी सण मोठ्या थाटामाटा साजरा केला जात असताना राज्य शासनाने दिवाळी सणाला आणखी दोन वस्तूंची वाढ करून सहा वस्तूंचा जीन्स संच वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले परंतु दिवाळीचा सण आला तरी अद्यापही तालुक्यात आनंदाचा शीधा पोहोचला नसल्याने गरिबांच्या घरी दिवाळीला नाग गोड ना धोड ना कुठले तळण अशी परिस्थिती दिसून आली आहे. गौरी गणपतीप्रमाणे दिवाळीलाही आनंदाचा शिधा मिळणार अशी अपेक्षा निर्माण झाली होती मात्र दिवाळी झाली तरीही आनंदाचा शिधा मिळालाच नाही त्यामुळे दिवाळीच्या सणावर विरजन पडले असून दिवाळीला आनंदाचा शिधा मिळेल अशी अपेक्षा होती मात्र तालुक्याच्या गोदामात अद्यापही आनंदाचा शिधा उपलब्ध झाला नसल्याने अद्यापही गोरगरिबांच्या झोळीत आनंदाचा शिधा पडलाच नाही त्यामुळे राज्य शासनाने सर्वसामान्यांची थट्टा केली आहे की काय असा सवाल लाभार्थ्यामधून उपस्थित होत आहे.

यंदाची दिवाळी गोड व्हावी यासाठी राज्य शासनाने आनंदाच्या शिधा किट मध्ये चार ऐवजी सहा वस्तू किट देण्याचा निर्णय घेतला मात्र या किट दिवाळीपूर्वी तालुक्याच्या गोडाऊन मध्ये उपलब्ध व्हायला पाहिजे होते परंतु तसे झालेले नाही त्यामुळे लाभार्थ्यांना शिधा किट मिळालीच नाही