
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
संगणक परिचालक हे देशाला डिजिटल बनवण्याच काम करत असून सुद्धा शासन त्यांच्या मागण्या मान्य करत नाही,त्यांच्याकडून आयुष्यमान कार्ड,इश्रम कार्ड,कर्जमाफी योजना, व ग्रामपंचायत चे इतर ऑफलाईन कामे विश्वकर्मा,1 ते 33 नमुने ऑनलाईन करणे तसेच लोकांना आवश्यक ते दाखले वेळेवर पुरवत असतात,आणि त्यांना तुटपुंज्या अश्या 6930 रू मानधनामध्ये कामे करावी लागतात.त्यांनी बऱ्याच वेळा शासणा सोबत पाठपुरवठा करून सुद्धा सरकार त्यांना केराची टोपली दाखवत आहे,त्यांच्या मागण्या पुढील प्रमाणे,
मा.यावलकर शिफारसीनुसार आकृतीबंध मध्ये समावेश करून घेणे.
आकृती बंद मध्ये समावेश करून घ्यायला वेळ लागत असेल तर आम्हाला 20,000 रू मानधन देण्यात यावे.
आमचे हक्काचे मानधन प्रत्येक महिन्याला एका निछित तारखेला देण्यात यावे.
आम्ही 12 वर्षा पासून शासना सोबत पाठपुरवठा करून सुद्धा आम्हाला न्याय मिळाला नाही त्यामुळे आम्हीं पूर्ण राज्यभर कामबंद आंदोलन पुकारले आहे व आमचे आंदोलन हे बेमुदत असेल त्यामुळे शासनाने आमचा अंत न पाहता संगणक परिचालक यांचे विषय लवकरात लवकर मार्गी लावावे, अन्यथा आम्ही दिनांक 28/11/2023 ला जिल्हा परिषद समोर आंदोलन करू तसेच दिनांक 04/12/2023 लां विधानसभा सदस्य व लोकसभा सदस्य यांच्या निवासस्थानी आंदोलन करू, शासनाने आमच्या मागण्या मान्य न केल्यास येणाऱ्या हिवाळी अधिवेशना मध्ये दिनांक 11/12/2023ला भव्यदिव्य असा आक्रोश बेमुदत आंदोलन करणार आहे.अशी माहिती किरण गाडगे,प्रीतम फुलमाळी,अरविंद डंभारे,बशीर शेख,नितीन गाडगे,सूरज कुळसंगे,वैभव भोयर,पंकज सावज,राहुल दारुंडे यांनी बोलताना सांगितली
