
पुणे : भाजपा सारख्या राष्ट्रवाद, स्वदेशी, राष्ट्र प्रथम च्या पोकळ वल्गना करणा-या, हिंदूत्वाचा खोटा बुरखा पांघरलेल्या पक्षांना आपण आज पर्यंत झेलत आलो कारण आपल्याला पर्याय दिसत नव्हता. आजची देशाची जर्जर अवस्था पहाता कर्तव्यनिष्ठ,नैतिकतेचा परमोच्च आदर्श असणारा अखिल भारत हिंदू महासभा हा निश्चयाचा महामेरु अढळपणे उभा आहे या महामेरुला नमन करुन पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देण्याची जाणिव प्रकर्षाने झाली होत आहे
1915 साली हिंदूह्रदय सम्राट स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्थापन केलेला हा हिंदू विजयाचा ध्वज ज्यांनी खांद्यावर घेतला, मिरवला आणि एक दिवस त्या ध्वजाशीच गद्दारी करुन भारतीय जनसंघ मग भाजप स्थापन झाला राष्ट्र प्रथम म्हणणा-या भाजपाचा मुखवटा मी अगदी सोप्या उदाहरणाने उतरवतो पण ते सत्य स्विकारुन बदल घडवण्यासाठी पुढे येण्याची मानसिकता तुमच्यातही असायला ही, उगाच डोळ्यावर कातडं ओढून बसण्यात काही अर्थ नाही
जगा बरोबर भारतावरही भयंकर महामारीचं सावट आलं
अशात हाफकीन सारखी 1956 सालची सरकारी कंपनी जीने आजपर्यंत हिवताप,मलेरीया,डेंग्यू अशा अनेक रोगांवर लशी बनवल्या पण राष्ट्र प्रथम म्हणणा-या भाजपाने हाफकीनला प्राधान्य देण्याऐवजी सिरम इन्स्टीट्यूट या खाजगी उद्योगाला प्राधान्य देत नफेखोरीची संधी मिळवून दिली म्हणजे जेव्हा आपण म्हणतो आदरणीय मोदींच्या वाढदिवसाला 2 कोटी लसीकरण झालं तेव्हा लस कंपनीचा 5 हजार करोडचा धंदा झालेला असतो
जर राष्ट्र प्रथम असतं तर सरकारी कंपनीच्या म्हणजे देशाच्या तिजोरीत हे पाच हजार करोड किंबहुना 130 कोटी भारतीयांना प्रत्येकी 2 डोस आणि आता तिस-या बुस्टरची सक्ती होईल म्हणजे 400 कोटी डोस गुणीले 2500 रुपये = 10,000,0000000
दहा हजार कोटी इतका राष्ट्राचा फायदा झाला असता अर्थातच तो मोदींच्या धोरणांनी खाजगी कंपनीला करुन दिला आहे
एका सोप्या आणि ताज्या उदाहरणाद्वारे मी हे पटवून दिलं आहे. अशी भाजप संघाच्या राष्ट्र् प्रथम या खोट्या विचारधारेला उघडे पाडणारी शेकडो उदाहरणे आहेत
म्हणजे एक 370 कलम हटवलं म्हणून आपण जर त्यांचे लाखो गुन्हे माफ करणार असु तर स्वातंत्यवीर सावरकरांची ती सप्तसिंधूसागरातली उडी वाया गेलीच म्हणून समजा
काँग्रेस नेत्यांचे उंच चायनीज पुतळे बांधणारे या राष्ट्राचं कधीच भलं करु शकत नाहीत हे सत्य स्विकारुन हिंदू महासभेला भरभरुन प्रतिसाद द्या
चला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अखंड भारताचे स्वप्न साकार करुन स्वदेशी स्वयंपुर्ण समृद्ध भारताची गुढी उभारुया,चला हिंदूस्थान घडवूया नारा आपटे यांनी दिला आहे. आपटे हे नथूराम गोडसेंचे सहकारी नारायण आपटे यांचे वंशज असुन आपटे घराण्याचा क्रांतीकारी वारसा अभिजित उर्फ बाळासाहेब आपटे यांच्याकडे आलेला आहे त्यामुळे हिंदू महासभा येणा-या काळात भाजपला मागे टाकून पुढे जाईल असा विश्वास हिंदू महासभेचे प्रदेश उपाध्यक्ष अरुण माळी व मुंबई प्रदेश नेते गणेश कदम यांना आहे.
