
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
वृत्तसंकलन करण्यास गेलेल्या पुसद येथील दोन पत्रकारावर झालेला हल्ला व त्यांचे कॅमेरे व ईतर साहित्यांची झालेली तोडफोड या 3डिसेंबर ला काळी दौलतखान येथे घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत, प्रेसक्लब आर्णी ने मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदार आर्णी यांचे मार्फत 6डिसेंबर ला दिले आहे. पत्रकार संरक्षण कायद्यानुसार हल्लेखोरांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सुध्दा निवेदनातून केली आहे.
प्रेसक्लब आर्णी चे अध्यक्ष जाफर शेख यांनी, पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत, हल्लेखोरांवर ताबडतोब कडक कारवाई करून अटक करण्याची मागणी केली. आर्णी प्रेसक्लबचे माजी अध्यक्ष गणेश हिरोळे यांनी पत्रकार संरक्षण कायदा वार्ताहरांच्या सुरक्षेसाठी लागू करण्यात यावा, तसेच सदर घटनेत पोलिसांनी तातडीने हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कडक कारवाई करावी अशी मागणी करत, घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. यावेळी प्रेसक्लब चे अध्यक्ष जाफर शेख, गणेश हिरोळे, रफिक सरकार, विनोद सोयाम, नौशाद सय्यद, प्रफुल जाधव, राम पवार, आसिफ शेख, आरिफ शेख, इरफान रजा, विशाल इंगोले पाटील व ईतर सदस्य उपस्थित होते.
