
सहसंपादक : रामभाऊ भोयर
कृषी अधिकारी कार्यालय राळेगाव येथील कृषी सहाय्यक तुषार शंकर मेश्राम हे जळका येते कृषी सहाय्यक म्हणून कार्यरत करत होते परंतु त्यांची राळेगाव कृषी कार्यालयातून बदली झाली असून मनमिळावू कृषी सहाय्यक तुषार शंकर मेश्राम यांना जळका येथील ग्रामस्थांनी त्यांचा निरोप घेत भावनिकता अर्पण केली. मेश्राम हे कृषी सहाय्यक या पदावर कार्यरत असताना त्यांनी आपल्या शांत, साध्या आणि मनमिळावू स्वभावाने सर्व गावकऱ्यांची मने जिंकली.
त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून शासनाच्या विविध कृषी योजना त्यांच्या पर्यंत पोहोचवून दिल्या. अधिकारी म्हणून त्यांनी केवळ आपले कर्तव्य पार पाडले नाही, तर गावातील प्रत्येक गरजूंना मदतीचा हात देण्यास तत्पर राहिले.
गावकऱ्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे, खऱ्या अर्थाने ‘जनतेचे अधिकारी’ अशी ओळख निर्माण करणाऱ्या मेश्राम यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत गावकऱ्यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना निरोप दिला.
या प्रसंगी गावातील अनेक नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त करत त्यांच्या बदलीमुळे झालेली हळहळ बोलून दाखवली. याप्रसंगी माजी सैनिक शंकर सायसे, अंकित चाहांदकर, सतीश मांडवकर, रामकृष्ण कांबळे, महेश येलेकार, वंदना कुटे, सतीश येलेकर, रवी येलेकर, उमेश पाल, गोपाळा कुटे, बंटी गवारकर, सुधाकर उगे, भानुदास लोणारे, नानाजी पांडे, सचिन मंगळ, सूरज सोणेकर, पंकज सोनेकार, सुभाष सोनारखन, वासुदेव दवरे यांच्यासह सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामस्थांच्या वतीने त्यांना पुढील सेवेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या व जळका गावात त्यांच्या आठवणी सदैव जिवंत राहतील, असे भावनिक उद्गगार व्यक्त करण्यात आले.
