नाशिक महानगर पालिका सुरू करणार अवास्तव बिल आकारणी तक्रार केंद्र…

प्रतिनिधी:तेजस सोनार,नाशिक

नाशिक मध्ये सध्या हॉस्पिटल च्या अवाजवी बिलांविरुद्ध सामान्य नाशिककरांमध्ये प्रचंड संताप आहे त्यातच काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावे यांनी वोकहार्ट हॉस्पिटल मध्ये अनामत रक्कम परत मिळावी या साठी अर्धनग्न आंदोलन ही केले आणि अवाजवी बिलाचा मुद्दा हा अधिक तीव्र झाला आणि प्रशासन आणि सत्ताधारी यांना जाग आली आणि अनेक हॉस्पिटल्स विरुद्ध कारवाई ची नोटीस पाठवली गेली. शहरातील इतर नागरिकांवर ही वेळ हेऊ नये म्हणून नाशिक चे महापौर सतीश कुलकर्णी यांनी सरकारी बांगला असलेल्या रामायण येथे हॉस्पिटल विरुद्ध तक्रार केंद्र उभारण्याची घोषणा केली आहे जेणेकरून जी काही चांगली हॉस्पिटल्स चांगलं काम करत आहेत ते या मध्ये भरडले जाऊ नये आणि चुकलेल्या हॉस्पिटल्स वर कारवाई करता येईल आणि नागरिकांना देखील जास्त धावपळ करावी लागणार नाही.